UPSC MPSC IAS preparation logo
SYNERGY STUDY POINT
UPSC and MPSC Coaching Class
आमचे MPSC गुणवंत
MPSC परीक्षा
UPSC MPSC IAS preparation   
   MPSC
UPSC MPSC IAS preparation   
   PSI
UPSC MPSC IAS preparation   
   STI
UPSC MPSC IAS preparation   
Download Documents
आमची पुस्तके

आमची पुस्तके

आमच्या पुस्तकांतून विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी प्रेरणा आणि मार्गदर्शन उपलब्ध होते. संपर्क : अभिजीत शिंदे : ७८८८०१२१४६, स्वप्ना जरग : ८९७५७६०३८०

अधिकारिणी


करिअर म्हणून नोकरशाहीचा मार्ग निवडून त्यामध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या महिला प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या अनुभवांचा एक महत्वपूर्ण आणि उपयुक्त लेखाजोखा म्हणजे अधिकारिणी. स्वप्ना जरग यांनी केलेला हा प्रयास म्हणजे या सर्व अधिकारीणींच्या आयुष्याचा घेतलेला आढावाच.
 

'बियॉंड आयएएस'


 महाराष्ट्रातील तरुणाईमध्ये स्पर्धापरीक्षांविषयीचे आकर्षण वाढत आहे. पण, या परीक्षांविषयी त्यांना पुस्तकरुपाने योग्य मार्गदर्शन मिळेल, असा खात्रीशीर स्त्रोत अजूनही उपलब्ध झालेला नाही. अर्थात काही पुस्तके उपलब्ध असली, तरी त्यांचा आवाका मर्यादित आहे. केंद्रीय लोकसेवा आयोग तब्बल २७ प्रकारच्या सेवांमधील सर्वोच्च पदांसाठी परीक्षा घेते, हे अनेकांच्या गावीही नसते. तसेच, काही सेवांविषयी असलीच, तर ती अगदीच जुजबी स्वरुपातील माहिती असते. खुद्द परीक्षा देणा-या विद्यार्थ्यांची ही अवस्था, तर भविष्यात याच क्षेत्रात करिअर घडवू पाहणारे कितीजण काळ्यामिट्ट अंधारात चाचपडत असतील, याची कल्पनाच केलेली बरी! त्यामुळे स्पर्धापरीक्षांची तयारी करणा-या प्रत्येकापर्यंत 'युपीएससी'कडून नेमक्या किती सेवांसाठी उमेदवार निवडण्यात येतात, त्या सेवांचे स्वरुप आणि त्यांची कार्यकक्षा, या सेवांमध्ये सध्या कार्यरत असणा-या अधिका-यांचे सेवेतील अनुभव आदी गोष्टींची विस्तृत माहिती देणा-या 'बियॉंड आयएएस'या पुस्तकात या सेवेत कार्यरत असणा-या अधिका-यांची मुलाखतवजा मनोगते समाविष्ट आहेत.
 

मानवी हक्क

सदर पुस्तक हे राज्यसेवा मुख्य परीक्षा'सामान्य अध्ययन पेपर -III 'मधील दुसरा भाग'मानवी हक्क' यावर आधारलेले आहे. यामध्ये मानवी हक्कांचा वैश्विकजाहीरनामा(UDHR),बाल विकास, महिला विकास, युवक विकास , आदिवासी विकास, वंचित वर्ग विकास, वयोवृद्ध कल्याण,कामगार कल्याण, अपंग कल्याण,लोकांचेपुनर्वसन , आंतरराष्ट्रीय संघटना , ग्राहक कल्याण, मूल्य व नीतीतत्वे यातेराघटकातील प्रत्येक मुद्द्याचा सविस्तर आढावा घेतला आहे. हे पुस्तक पूर्णतःपरिक्षाभिमुख(exam oriented), अधिकृत संसाधने(Authentic Resources) जसे कीशासकीय वेबसाइट्स , इंडिया इयर बुक , भारताचा व महाराष्ट्राचा आर्थिक पाहणीअहवाल इ. वर आधारित व Apr 2016 पर्यंतच्या सर्व शासकीय धोरणे , योजना , कार्यक्रम इ. चा समावेश असणारे विद्यार्थ्यांना अत्यंत उपयुक्त ठरणारा संदर्भग्रंथ नक्कीच ठरेल यात शंका नाही.
 

मानव संसाधन विकास


सदर पुस्तक हे राज्यसेवा मुख्य परीक्षा 'सामान्य अध्ययन पेपर -III 'मधील पहिला भाग 'मानवसंसाधन विकास' यावर आधारलेले आहे. यामध्ये भारतातील मानव संसाधनविकास,शिक्षण, व्यावसायिक शिक्षण, आरोग्य आणि ग्रामीण विकास या पाच घटकातीलप्रत्येक मुद्द्याचा सविस्तर आढावा घेतला आहे.  हे पुस्तक पूर्णतःपरिक्षाभिमुख(exam oriented), अधिकृत संसाधने(Authentic Resources) जसे कीशासकीय वेबसाइट्स , इंडिया इयर बुक , भारताचा व महाराष्ट्राचा आर्थिक पाहणीअहवाल इ. वर आधारित व Apr 2016 पर्यंतच्या सर्व शासकीय धोरणे , योजना , कार्यक्रम इ. चा समावेश असणारे विद्यार्थ्यांना अत्यंत उपयुक्त ठरणारा संदर्भग्रंथ नक्कीच ठरेल यात शंका नाही

Synergy Study Point @ 2015 All Rights Reserved.