UPSC MPSC IAS preparation logo
SYNERGY STUDY POINT
UPSC and MPSC Coaching Class
आमचे MPSC गुणवंत
MPSC परीक्षा
UPSC MPSC IAS preparation  
   MPSC
UPSC MPSC IAS preparation  
   PSI
UPSC MPSC IAS preparation  
   STI
UPSC MPSC IAS preparation  
Download Documents
आमची पुस्तके

नेहमी विचारले जाणारे प्रश्न 


१. मी सिनर्जीमध्येच प्रवेश का घ्यावा?

सिनर्जी म्हणजे एकत्रित येऊन नाविन्यपूर्ण निर्मितीचा ध्यास घेणे.... एक संस्था म्हणून सिनर्जी माजी विद्यार्थ्यांच्या भक्कम पाठींब्यावरउभी आहे. जाहिरातींना न भुलता मौखिक प्रसिद्धीमुळेच बहुतांश विद्यार्थी सिनर्जीमध्ये प्रवेश घेतात.
सर्व जुने विद्यार्थी सिनर्जीबाबत समाधानी आहेत, कारण :- १०० हून अधिक सिनर्जी विद्यार्थी DC,Dy.SP, BDO,DDR, तहसीलदार अशा पदांसाठी नियुक्त झाले आहेत.(हे विद्यार्थी सिनर्जीची बॅच केलेले आहेत. फक्त मुलाखत मार्गदर्शनासाठी आलेले नव्हेत.)
 
2. सिनर्जीचे वेगळेपण नेमके कशात आहे?

सिनर्जी चे वेगळेपण खालील गोष्टींतून अधोरेखित होते.
 • अनुभवी मार्गदर्शक आणि वैयक्तीक पाठपुरावा करणारा तसेच सहजपणे उपलब्ध असणारा   शिक्षकवृंद
 • वेळेवर अभ्यासक्रमाची पूर्तता
 • एकत्रितपणे मुद्रित नोट्स
 • सखोल टेस्ट सिरिज
 • पूर्व तसेच मुख्य परीक्षेच्या टेस्ट सिरिजचा तुलनात्मक निकाल
 • OMR SHEETद्वारे उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन.
 • परीक्षापूरक दृष्टिकोन निर्मितीवर भर.
 • चालू घडामोडींवर विशेष भर.
 • शांत वातावरण
 • अप्पा बळवंत चौकाजवळील स्थान (सर्व पुस्तके सहज उपलब्ध).
 • राहण्याची तसेच अभ्यासिकेची जवळपास होणारी सहज सोय.
 • गुणवत्तापूर्ण पायाभूत सुविधा - ए. सी. वर्ग, आरामदायी बेंच,
 • मॉडर्न ऑडिओ सिस्टिम, पार्किंगची सोय इ. 
३. सिनर्जीमधील शिक्षक स्टाफ कोण आहे?

सिनर्जीमधील सर्व शिक्षकांना MPSC व UPSC परीक्षेच्या सर्व (तीनही) टप्प्यांचा गाढा अनुभव आहे. त्यांचा अनुभव आणि परिक्षेच्या अभ्यासातील सद्य प्रवाह यांच्या योग्य मिलाफातून विद्यार्थ्यांच्या अपेक्षित मागण्या पूर्ण होतात. 

४. MPSC च्या तयारीसाठी ग्रंथालयाची आवश्यकता आहे का?

अभ्यासक्रमाच्या सर्व घटकांसाठी सिनर्जीमध्ये तयार नोट्स पुरविल्या जातात. या बरोबरच आवश्यक त्या पुस्तकांची यादीसुद्धा दिली जाते. विद्यार्थ्यांनी ही पुस्तके विकत घेणे अपेक्षित आहे. जर एखादे पुस्तक फारच महाग किंवा बाजारात उपलब्धच होत नसेल तर ते सिनर्जीच्या ग्रंथालयात उपलब्ध होते. 

५. राहण्याची सोय किंवाअभ्यासिकेचे काय?

मुलींसाठी सिनर्जीच्या आवारातच मर्यादित जागांसाठी वसतीगृहाची सोय आहे. तसेच सिनर्जी मध्यवस्तीत असल्यामुळे आसपास बरीच वसतीगृहे आणि अभ्यासिका हाकेच्या अंतरावर आहेत.

Synergy Study Point @ 2015 All Rights Reserved.