UPSC MPSC IAS preparation logo
SYNERGY STUDY POINT
UPSC and MPSC Coaching Class
आमचे MPSC गुणवंत
MPSC परीक्षा
UPSC MPSC IAS preparation   
   MPSC
UPSC MPSC IAS preparation   
   PSI
UPSC MPSC IAS preparation   
   STI
UPSC MPSC IAS preparation   
Download Documents
आमची पुस्तके

आमचे धोरण

प्रत्येक व्यक्तीच्या मनातील स्फुल्लिंग चेताविल्याशिवाय तिच्यामधील सुप्त गुण बाहेर पडून चमकत नाहीत. आम्ही सिनर्जीमध्ये हजारो कार्यक्षम व पात्र पदवीधर युवकांची मने प्रज्वलित करून स्पर्धा परीक्षेत यशाच्या शिखराकडे मार्गक्रमण करण्यासाठी प्रोत्साहित करून मार्गदर्शन करत आहोत.
 

आमचे मूल्य

यु. पी. एस. सी. / एम. पी. एस. सी. मार्गदर्शन संस्था या नात्याने आम्ही यशाचे अत्युच्च मानदंड प्रस्थापित केले असून विद्यार्थ्यांच्या यश प्राप्तीसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहोत. ‘अध्यापन’ हा एक नैतिक मूल्ये जोपासणारा पेशा आहे आणि आम्ही त्याच्या मूल्यांशी एकनिष्ठ आहोत. आम्हाला असे वाटते कि सध्याच्या बदलत्या परिस्थिती मध्ये शिक्षण क्षेत्राचे पावित्र्य अधिक काळजीपूर्वक जपायला पाहिजे.
 

पार्श्वभूमी

या संस्थेची स्थापना श्री अतुल लांडे, श्री बिपीन अहिरे आणि श्री अमोल यादवाडकर यांनी २००६ मध्ये केली.

स्थापनेपासून आतापर्यंत संस्थेने IAS, IPS,IFS, तसेच Deputy Collector, DySP,तहसीदार अशा नागरी सेवामध्ये प्रवेश करण्यासाठी अनेक विद्यार्थ्यांना मदत केली आहे. संस्थेच्या अध्यापक वर्गात उच्चशिक्षित आणि अनुभवी तज्ज्ञांचा समावेश आहे. त्यांच्यापैकी सर्वांनाच स्पर्धा परीक्षेच्या तिन्ही टप्प्यांचा अनुभव आहे.

संस्थेच्या सल्लागार मंडळामध्ये श्री अमोल खैरनार (IRS), श्री नीलकंठ शेळके (IRS), श्री बिपीन अहिरे (IPS), श्री राजेश स्वामी (IFS), श्री विजय पिंगळे (IAS),श्री संतोष चाळके (IPS), तसेच रुपाली दरेकर (DySP), श्री सचिन खल्लाळ(DC),श्री अविनाश भागवत(DDR), पर्निता बुरांडे (DDR), श्री संदीप घोणशीकर (DCE) यांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांच्या परीक्षाविषयक दृष्टीकोनाला पैलू पाडण्याचे महत्वपूर्ण काम ते करतात.

Synergy Study Point @ 2015 All Rights Reserved.