UPSC MPSC IAS preparation logo
SYNERGY STUDY POINT
UPSC and MPSC Coaching Class
आमचे MPSC गुणवंत
MPSC परीक्षा
UPSC MPSC IAS preparation  
   MPSC
UPSC MPSC IAS preparation  
   PSI
UPSC MPSC IAS preparation  
   STI
UPSC MPSC IAS preparation  
Download Documents
आमची पुस्तके

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणा-या इतर परीक्षा

महाराष्ट्र वनसेवा परीक्षा


 • राज्यशासनाच्या वनसेवेतील राजपत्रित गट अ आणि गट ब वर्गातील पदे या परीक्षेमधून भरली जातात.

       शैक्षणिक अर्हता:

 • खालील विषयांपैकी कमीत कमी एका विषयाची मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी
  • वनस्पतीशास्त्र
  • रसायनशास्त्र 
  • वनशास्त्र 
  • भूशास्त्र 
  • गणित 
  • भौतिकशास्त्र 
  • सांखिकी        
  • प्राणीशास्त्र 
  • उद्यानविद्या
  • किंवा कृषी अभियांत्रिकी, पशुसंवर्धन व पशुवैद्यकशास्त्र यातील स्नातक पदवीधर.

ही परीक्षा एकूण तीन टप्प्यात घेण्यात येते.
१. पूर्व परीक्षा     - २०० गुण
२. मुख्य परीक्षा  - ४०० गुण
३. मुलाखत      - ५० गुण

पूर्व परीक्षा
पूर्व परीक्षा ही मुख्य परीक्षेसाठी उमेदवारांची संख्या मर्यादित करण्यासाठी चाळणी परीक्षा असते.याकरता पूर्व परीक्षेमध्ये आयोगाने निश्चित केलेल्या सीमारेषेइतके अथवा त्यापेक्षा अधिक गुण प्राप्त करणे आवश्यक असते. पूर्व परीक्षेचे गुण अंतिम निवडीच्या वेळी गृहीत धरले जात नाहीत.तसेच ते उमेदवारांना कळविले जात नाहीत.

पूर्व परीक्षा स्वरूप: प्रश्नपत्रिका : एक अनिवार्य

प्रश्नपत्रिकेचे स्वरूप पुढीलप्रमाणे

पेपर प्रश्न संख्या गुण दर्जा माध्यम कालावधी पेपरचे स्वरूप
सामान्य अध्ययन १०० २०० दहावी मराठी व इंग्रजी एक तास वस्तुनिष्ठ बहुपर्यायी

 
अभ्यासक्रम: सविस्तर अभ्यासक्रम आयोगाच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

मुख्य परीक्षा: मुख्य परीक्षेमध्ये इंग्रजी व मराठी भाषांचे पेपर लेखी स्वरूपाचे तर सामान्य अध्ययन विषयाचे पेपर वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रकारचे असतात.लेखी परीक्षेतील प्रश्नपत्रिकांचे स्वरूप पुढीलप्रमाणे आहे.
 
मुख्य परीक्षेतील प्रश्नपत्रिकांचे स्वरूप 

प्रश्नपत्रिकांची संख्या : दोन
प्रत्येक प्रश्नपत्रिकेचा तपशील खालीलप्रमाणे :

पेपर क्र. विषय दर्जा कालावधी प्रश्न गुण माध्यम परीक्षेचे स्वरूप
पेपर क्र.१ सामान्य अध्ययन पदवी एक तास १०० २०० मराठी व इंग्रजी वस्तुनिष्ठ बहुपर्यायी
पेपर क्र.२ Nature conservation पदवी एक तास १०० २०० इंग्रजी वस्तुनिष्ठ बहुपर्यायी

अभ्यासक्रम: सविस्तर अभ्यासक्रम आयोगाच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

मुलाखत:
मुख्य परीक्षेच्या निकालाच्या आधारे मुलाखतीसाठी पात्र ठरणा-या उमेदवारांच्या मुलाखती आयोगाच्या कार्यक्रमानुसार तसेच आयोगाने निश्चित केलेल्या ठिकाणी व वेळेस घेण्यात येतात.

अंतिम निकाल :
मुख्य परीक्षा व मुलाखतीमध्ये प्राप्त केलेल्या गुणांची एकत्रित बेरीज करून गुणवत्ताक्रमानुसार अंतिम यादी (Merit List) तयार करण्यात येते. कर सहायक गट क परीक्षा


राज्य शासनाच्या विक्रीकर विभागातील कर सहायक गट क संवर्गातील पदे भरण्यासाठी ही परीक्षा घेण्यात येते. यामध्ये ४०० गुणांची थेट लेखी परीक्षा घेतली जाते. ही परीक्षा देण्यासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी तसेच मराठी टंकलेखनाचा वेग ३० शब्द प्रतीमिनिट व इंग्रजी टंकलेखनाचा वेग ४० शब्द प्रतीमिनिट असावा लागतो. तसेच उमेदवाराला मराठी भाषेचे ज्ञान असणे अत्यावश्यक आहे. लेखी परीक्षेतील प्रश्नपत्रिकेचे स्वरूप पुढीलप्रमाणे आहे.

विषय माध्यम दर्जा प्रश्न संख्या एकूण गुण कालावधी स्वरूप
मराठी मराठी बारावी  
 
 

२००

 
 
 

४००

 
 
 

दोन तास

 
 

वस्तुनिष्ठ बहुपर्यायी

इंग्रजी इंग्रजी पदवी
सामान्य ज्ञान व बुद्धिमत्ता चाचणी मराठी बारावी
पुस्तपालन व लेखाकार्म
(Book Keeping and Accountancy)
मराठी बारावी

अभ्यासक्रम: सविस्तर अभ्यासक्रम आयोगाच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे

वस्तुनिष्ठ स्वरूपाच्या उत्तरपत्रिकांचे मुल्यांकन करताना उत्तरपत्रिकेत नमूद केलेल्या योग्य उत्तरांनाच गुण दिले जातात या परीक्षेकरता ऋणात्मक गुण पद्धतीचा वापर केला जातो.यामध्ये चार चुकीच्या उत्तरांसाठी एका प्रश्नाचे गुण वजा केले जातात.

अंतिम निकाल :
लेखी परीक्षेमध्ये प्राप्त केलेल्या गुणांच्या आधारे गुणवत्ताक्रमानुसार अंतिम यादी (Merit List) तयार करण्यात येते. 

Synergy Study Point @ 2015 All Rights Reserved.