UPSC MPSC IAS preparation logo
SYNERGY STUDY POINT
UPSC and MPSC Coaching Class
आमचे MPSC गुणवंत
MPSC परीक्षा
UPSC MPSC IAS preparation  
   MPSC
UPSC MPSC IAS preparation  
   PSI
UPSC MPSC IAS preparation  
   STI
UPSC MPSC IAS preparation  
Download Documents
आमची पुस्तके

राज्य सेवा परीक्षा


राज्य शासनाच्या सेवेतील अतांत्रिक गट- अ व गट- ब संवर्गातील पुढील पदे या परीक्षेमधून भरली जातात.

अ.क्र. पदाचे नाव
(गट - अ पदे )
नियुक्तीचे ठिकाण अ.क्र. पदाचे नाव
(गट - ब पदे)
नियुक्तीचे ठिकाण
उपजिल्हाधिकारी महाराष्ट्रात कोठेही सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी महाराष्ट्रात कोठेही
पोलीस उपअधीक्षक महाराष्ट्रात कोठेही लेखा अधिकारी-महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा महाराष्ट्रात कोठेही
सहायक विक्रीकर आयुक्त
 
महाराष्ट्रात कोठेही कक्ष अधिकारी फक्त मुंबई
उपनिबंधक सहकारी संस्था महाराष्ट्रात कोठेही सहायक गट विकास अधिकारी महाराष्ट्रात कोठेही
गट विकास अधिकारी महाराष्ट्रात कोठेही मुख्याधिकारी नगरपालिका/परिषद-गट ब नगरपालिका/परिषद क्षेत्रात
सहायक संचालक,महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा महाराष्ट्रात कोठेही सहायक निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्रात कोठेही
मुख्याधिकारी नगरपालिका/परिषद-गट अ नगरपालिका/परिषद क्षेत्रात उप अधीक्षक - भूमी अभिलेख महाराष्ट्रात कोठेही
अधीक्षक-राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्रात कोठेही उप अधीक्षक-राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्रात कोठेही
तहसिलदार महाराष्ट्रात कोठेही सहायक आयुक्त - राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्रात कोठेही
  १० नायब तहसिलदार
 
महाराष्ट्रात कोठेही

 
ही परीक्षा एकूण तीन टप्प्यात घेण्यात येते.

१. पूर्व परीक्षा      - ४०० गुण
२. मुख्य परीक्षा   - ८०० गुण
३. मुलाखत       - १०० गुण

पूर्व परीक्षा

पूर्व परीक्षा ही मुख्य परीक्षेसाठी उमेदवारांची संख्या मर्यादित करण्यासाठी चाळणी परीक्षा असते.याकरता पूर्व परीक्षेमध्ये आयोगाने निश्चित केलेल्या सीमारेषेइतके अथवा त्यापेक्षा अधिक गुण प्राप्त करणे आवश्यक असते.या परीक्षेकरता ऋणात्मक गुण पद्धतीचा वापर केला जातो.यामध्ये तीन चुकीच्या उत्तरांसाठी एका प्रश्नाचे गुण वजा केले जातात.पूर्व परीक्षेचे गुण अंतिम निवडीच्या वेळी गृहीत धरले जात नाहीत.तसेच ते उमेदवारांना कळविले जात नाहीत.
 

पूर्व परीक्षा स्वरूप:
प्रश्नपत्रिका : दोन अनिवार्य

प्रश्नपत्रिकांचे स्वरूप पुढीलप्रमाणे

पेपर प्रश्न संख्या गुण दर्जा माध्यम कालावधी पेपरचे स्वरूप
सामान्य अध्ययन १०० २०० पदवी मराठी व इंग्रजी दोन तास वस्तुनिष्ठ बहुपर्यायी
कलचाचणी (CSAT) ८० २०० पदवी मराठी व इंग्रजी दोन तास वस्तुनिष्ठ बहुपर्यायी

पूर्व परीक्षा अभ्यासक्रम

पेपर १ : सामान्य अध्ययन
 1. चालू घडामोडी : स्थानिक,राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय महत्वाच्या.
 2. भारताचा इतिहास (महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह) आणि भारतीय राष्ट्रीय चळवळ
 3. महाराष्ट्राचा,भारताचा आणि जगाचा प्राकृतिक सामाजिक आणि आर्थिक भूगोल
 4. महाराष्ट्र आणि भारत : राज्यव्यवस्था आणि राज्यकारभार - घटना, राज्यव्यवस्थेच्या पद्धती, पंचायती राज, शहरी राज्यकारभार, सार्वजनिक नीती, हक्क इ.
 5. आर्थिक व सामाजिक विकास - शाश्वत विकास, दारिद्र्य, समावेशन,लोकसंख्याशास्त्र, सामाजिक क्षेत्र उपक्रम इ.
 6. पर्यावरणीय परिस्थितीकी, जैवविविधता आणि हवामानबदलासंबंधीत सामान्य बाबी ज्यासाठी या विषयावर प्रभुत्वाची आवश्यकता नाही.
 7. सामान्य विज्ञान
पेपर २ :कलचाचणी (CSAT)
 1. आकलनक्षमता (पदवी स्तर)
 2. संभाषण कौशल्याच्या समावेशासह आंतरवैयक्तिक क्षमता (पदवी स्तर)
 3. तर्क अनुमान आणि विश्लेषण क्षमता (पदवी स्तर)
 4. निर्णय घेऊन समस्या निराकरण क्षमता (पदवी स्तर)
 5. सामान्य बुद्धिमापन क्षमता (पदवी स्तर)
 6. मुलभूत अंकगणित (अंक व त्यांचे संबंध,घातांक,पदावल्या इ.)
 7. माहितीचे आकलन (आलेख सारणी,तक्ते इ.)-(दहावी स्तर)
 8. मराठी आणि इंग्रजी आकलनक्षमता (दहावी/बारावी स्तर)
टीप:
 • राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या मुल्यांकनाकरता उमेदवाराने दोन्ही पेपर्सना उपस्थित राहणे अनिवार्य आहे.अन्यथा उमेदवारांना अनर्ह ठरविण्यात येते.
 • वस्तुनिष्ठ स्वरूपाच्या उत्तरपत्रिकांचे मुल्यांकन करताना उत्तरपत्रिकेत नमूद केलेल्या योग्य उत्तरांनाच गुण दिले जातात. या परीक्षेतील पेपर क्र.दोन मधील निर्णय घेऊन समस्या निराकरण क्षमता या घटकाच्या चुकीच्या उत्तरांसाठी गुण वजा करण्यात येत नाहीत.
 
मुख्य परीक्षा

मुख्य परीक्षेमध्ये इंग्रजी व मराठी भाषांचे पेपर लेखी स्वरूपाचे तर सामान्य अध्ययन विषयाचे पेपर वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रकारचे असतात.लेखी परीक्षेतील प्रश्नपत्रिकांचे स्वरूप पुढीलप्रमाणे आहे.
 

मुख्य परीक्षेतील प्रश्नपत्रिकांचे स्वरूप

प्रश्नपत्रिकांची संख्या : सहा

प्रत्येक प्रश्नपत्रिकेचा तपशील खालीलप्रमाणे :

अ.क्र. विषय गुण दर्जा माध्यम कालावधी स्वरूप
१. मराठी १०० उच्च माध्यमिक शालांत मराठी ३ तास पारंपारिक
२. इंग्रजी १०० उच्च माध्यमिक शालांत इंग्रजी ३ तास पारंपारिक
३. सामान्य अध्ययन-१ १५० पदवी मराठी व इंग्रजी २ तास वस्तुनिष्ठ बहुपर्यायी
४. सामान्य अध्ययन-२ १५० पदवी मराठी व इंग्रजी २ तास वस्तुनिष्ठ बहुपर्यायी
५. सामान्य अध्ययन-३ १५० पदवी मराठी व इंग्रजी २ तास वस्तुनिष्ठ बहुपर्यायी
६. सामान्य अध्ययन-४ १५० पदवी मराठी व इंग्रजी २ तास वस्तुनिष्ठ बहुपर्यायी
 
 • वस्तुनिष्ठ स्वरूपाच्या उत्तरपत्रिकांचे मुल्यांकन करताना उत्तरपत्रिकेत नमूद केलेल्या योग्य उत्तरांनाच गुण दिले जातात. प्रत्येक तीन चुकीच्या उत्तरांमागे एका प्रश्नाचे गुण एकूण प्राप्त गुणांमधून वजा केले जातात.
 • २०१३ पासून आयोगाने शतमत (पर्सेंटाईल) पद्धत लागू केली आहे.यानुसार प्रत्येक विषयात सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारास सर्वोत्कृष्ठ गुणप्राप्त उमेदवाराच्या ३५ टक्के पर्यंत,मागासवर्गीय उमेदवाराना ३०टक्के पर्यंत तर अपंग व खेळाडूना २० टक्के पर्यंत गुण प्राप्त होणे आवश्यक असते.
 • शतमत पद्धत फक्त मुलाखतीस पात्र होण्यासाठी आवश्यक पटीत उमेदवार ठरविण्यापुरतीच आहे.अंतिम निकाल व निवड उमेदवारांना लेखी व तोंडी परीक्षेत मिळालेल्या प्रत्यक्ष गुणांच्या बेरजेवर व त्यानुसार येणारया उमेदवारांच्या गुनानुक्रमानुसारच ठरते.
मुलाखत 

मुख्य परीक्षेच्या निकालाच्या आधारे मुलाखतीसाठी पात्र ठरणा-या उमेदवारांच्या आयोगाच्या कार्यक्रमानुसार तसेच आयोगाने निश्चित केलेल्या ठिकाणी व वेळेस घेण्यात येतात.

अंतिम निकाल :

 मुख्य परीक्षा व मुलाखतीमध्ये प्राप्त केलेल्या गुणांची एकत्रित बेरीज करून गुणवत्ताक्रमानुसार अंतिम यादी (Merit List) तयार करण्यात येते.

Synergy Study Point @ 2015 All Rights Reserved.