UPSC MPSC IAS preparation logo
SYNERGY STUDY POINT
UPSC and MPSC Coaching Class
आमचे MPSC गुणवंत
MPSC परीक्षा
UPSC MPSC IAS preparation  
   MPSC
UPSC MPSC IAS preparation  
   PSI
UPSC MPSC IAS preparation  
   STI
UPSC MPSC IAS preparation  
Download Documents
आमची पुस्तके

S.T.I.परीक्षाराज्य शासनाच्या सेवेतील विक्रीकर निरीक्षक(S.T.I.)गट ब(अराजपत्रित) संवर्गातील पदे भरण्यासाठी ही परीक्षा घेण्यात येते. ही परीक्षा एकूण दोन टप्प्यात घेण्यात येते.

 

 1. पूर्व परीक्षा - १०० गुण
 2. मुख्य परीक्षा -       
  1. लेखी परीक्षा : ४०० गुण       

पूर्व परीक्षा


पूर्व परीक्षा ही मुख्य परीक्षेसाठी उमेदवारांची संख्या मर्यादित करण्यासाठी चाळणी परीक्षा असते.याकरता पूर्व परीक्षेमध्ये आयोगाने निश्चित केलेल्या सीमारेषेइतके अथवा त्यापेक्षा अधिक गुण प्राप्त करणे आवश्यक असते.या परीक्षेकरता ऋणात्मक गुण पद्धतीचा वापर केला जातो.यामध्ये चार चुकीच्या उत्तरांसाठी एका प्रश्नाचे गुण वजा केले जातात.पूर्व परीक्षेचे गुण अंतिम निवडीच्या वेळी गृहीत धरले जात नाहीत.तसेच ते उमेदवारांना कळविले जात नाहीत.

पूर्व परीक्षा अभ्यासक्रम
 1. चालू घडामोडी : जागतिक तसेच भारतातील
 2. नागरिकशास्त्र : भारताच्या घटनेचा प्राथमिक अभ्यास,राज्य व्यवस्थापन (प्रशासन), ग्रामप्रशासन
 3. आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास
 4. भूगोल (महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह) : पृथ्वी,जगातील विभाग, हवामान, अक्षांश, रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार,पर्जन्यमान,प्रमुख पिके,शहरे,नद्या,उद्योगधंदे इत्यादी.
 5. अर्थव्यवस्था : भारतीय अर्थव्यवस्था - राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग,परकीय व्यापार,बँकिंग,लोकसंख्या,दारिद्र्य व बेरोजगारी, मुद्रा आणि राजकोषीय नीती इत्यादी.शासकीय अर्थव्यवस्था - अर्थसंकल्प, लेख, लेखापरीक्षण, इ.
 6. सामान्य विज्ञान : भौतिकशास्त्र (फिजिक्स), रसायनशास्त्र(केमिस्ट्री), प्राणीशास्त्र(झुलॉजी), वनस्पतीशास्त्र(बॉटनी)
 7. बुद्धिमापन चाचणी व अंकगणित

 मुख्य परीक्षा


ही परीक्षा लेखी परीक्षा आणि मुलाखत अशा दोन टप्प्यात घेण्यात येते. लेखी परीक्षेचे स्वरूप वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रकारचे असते, तर मुलाखतीमधून उमेदवाराच्या व्यक्तिमत्वाची चाचणी घेतली जाते.लेखी परीक्षेतील प्रश्नपत्रिकांचे स्वरूप पुढीलप्रमाणे आहे.

लेखी परीक्षेतील प्रश्नपत्रिकांचे स्वरूप

प्रश्नपत्रिकांची संख्या : दोन

प्रत्येक प्रश्नपत्रिकेचा तपशील खालीलप्रमाणे :

 

 
पेपर क्रमांक            
विषय गुण प्रश्नसंख्या दर्जा माध्यम कालावधी
           
पेपर क्रमांक १  मराठी व  ५०  ५०  बारावी  मराठी   
  एक तास 
  इंग्रजी ३० ३० पदवी इंग्रजी  
  सामान्य ज्ञान  २० २० पदवी मराठी व इंग्रजी  
  सामान्य ज्ञान व बुद्धिमापन   १००   १०० पदवी मराठी व इंग्रजी   एक तास
पेपर क्रमांक 2
 
           
 • वस्तुनिष्ठ स्वरूपाच्या उत्तरपत्रिकांचे मुल्यांकन करताना उत्तरपत्रिकेत नमूद केलेल्या योग्य उत्तरांनाच गुण दिले जातात. प्रत्येक तीन चुकीच्या उत्तरांमागे एका प्रश्नाचे गुण एकूण प्राप्त गुणांमधून वजा केले जातात.
 • २०१३ पासून आयोगाने शतमत (पर्सेंटाईल) पद्धत लागू केली आहे.यानुसार प्रत्येक विषयात सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवारास सर्वोत्कृष्ठ गुणप्राप्त उमेदवाराच्या ३५ टक्के पर्यंत,मागासवर्गीय उमेदवाराना ३०टक्के पर्यंत तर अपंग व खेळाडूना २० टक्के पर्यंत गुण प्राप्त होणे आवश्यक असते.
 • शतमत पद्धत फक्त मुलाखतीस पात्र होण्यासाठी आवश्यक पटीत उमेदवार ठरविण्यापुरतीच आहे.अंतिम निकाल व निवड उमेदवारांना लेखी व तोंडी परीक्षेत मिळालेल्या प्रत्यक्ष गुणांच्या बेरजेवर व त्यानुसार येणारया उमेदवारांच्या गुनानुक्रमानुसारच ठरते. 

अंतिम निकाल :
मुख्य परीक्षेमध्ये प्राप्त केलेल्या गुणांवर आधारित गुणवत्ताक्रमानुसार अंतिम यादी (Merit List) तयार करण्यात येते.

Synergy Study Point @ 2015 All Rights Reserved.